¡Sorpréndeme!

आणि नरेंद्र मोदी अचानक का थांबले | Latest Political News | Lokmat News

2021-09-13 0 Dailymotion

आज शिमल्यामध्ये मंत्रि मंडळाच्या शपथविधी च्या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. कार्यक्रम संपल्यानंतर हेलीपॅडच्या दिशेने मोदींचा ताफा निघाला. मात्र अनाचक हा ताफा मॉल रोडवर आल्यानंतर थांबला. या अनियोजित थांब्यासाठी कारणही तसे विशेषच होते. पंतप्रधान मोदींचा ताफा शिमल्या तील प्रसिद्ध इंडियन कॉफी हाऊस समोर थांबला कारण मोदींना तेथील कॉफी प्यायची होती. हे कॉफी शॉप म्हणजे मोदींचा कॉफीचा जुना अड्डा आहे असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. कारण मोदी स्वत: पक्ष कार्यकर्ते म्हणून काम करत असताना तसेच पक्षासंदर्भातील इतर कामांसाठीही जेव्हा शिमल्यात येत असतं तेव्हा आवर्जून येथे थांबून कॉफीचा आस्वाद घेत असतं. ती परंपरा त्यांनी आजही जपली असचं म्हणावं लागेल.या अचानक झालेल्या कॉफी शॉप दौऱ्याबद्दल मोदींने अगदी आपल्या ट्विटर वरूनही माहिती दिली. शिमल्यात आज इंडियन कॉफी हाऊसमध्ये कॉफी प्यायलो आणि जुन्या दिवसांची आठवण झाली. जेव्हा मी पक्षाच्या कामासंदर्भात वरचेवर शिमल्याला यायचो तेव्हासारखीच म्हणजेच २० वर्षापूर्वी सारखीच चव आहे या कॉफीची आजही अशा आशयाचे ट्विट मोदींने केले आहे.


आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews